उन्हाचा पारा वर चढतोय ! उष्माघात टाळा आणि सुरक्षित राहा.

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात तापमानात वाढ होत असताना, या दिवसात उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, उन्हाळ्यात आरोग्य चांगले राखण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी, उन्हाळ्याशी संबंधित आजार टाळण्यासाठी तयार राहणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. या लेखात, आपण उष्माघात - त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, उपचार आणि उष्णतेच्या लाटेमध्ये सुरक्षित राहण्यासाठी सामान्य मार्गदर्शक तत्त्वे यावर प्रकाश टाकणार आहे. आशा आहे की ही माहिती तुम्हाला या कडक उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यास मदत करेल. उष्माघात म्हणजे काय? सनस्ट्रोक, ज्याला उष्माघात म्हणून देखील ओळखले जाते, जेव्हा उच्च तापमान आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे शरीर जास्त गरम होते तेव्हा ही समस्या उद्भवते. ही एक गंभीर स्थिती आहे ज्यासाठी त्वरित वैद्यकीय पुचार करणे आवश्यक असते. विदर्भात दिवसाचे तापमान उन्हाळ्यात ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. शेतात काम करणे, अंगमेहनतीचे काम करणे, घराबाहेर खेळणे, प्रवास करताना सामान्यतः सनस्ट्रोक/ उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे: - उच्च तापमान: 104°F (40°C) किंवा त्याहून अधिक शरीराचे तापमान वाढणे. - डोकेदुख...